ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूरः महाराष्ट्रात दोन दिवसात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.संध्याकाळी पाचच्या सुमारास कोल्हापुरात पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि गारपीटसह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान आज आजरा- चंदगड तालुक्याला सर्तकतेचा इशारा दिला होता.
कोल्हापुरात संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर नागरिकांची धावपळ उडाली. यावेळी महानगर पालिकेने सिंग्नलच्या स्पिकवर नागरिकांना सतर्कतेचे आव्हान केले. दरम्यान पावसाने शहरातील रस्त्यांनी तळ्याचे रुप धारण केले. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.