Saturday, January 31, 2026
Homeमनोरंजन8 वर्षांपासून आमच्या दोघांचे शारीरिक संबंध नाही अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनीवर पतीने केले...

8 वर्षांपासून आमच्या दोघांचे शारीरिक संबंध नाही अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनीवर पतीने केले आरोप

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. वर्षाचा पती अनुभव मोहंतीसोबत घटस्फोटाचा वाद सुरू आहे. अनुभव हे बीजेडीचे खासदार आहेत. दोघांचे वैयक्तिक आयुष्य जगजाहीर झाले आहे. पतीपत्नीमधील तणाव वाढतच आहे.


अनुभव मोहंती यांनी पत्नीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वर्षा आणि अनुभव मोहंतीने गेल्या 8 वर्षांपासून आमच्या दोघांचे शारीरिक संबंध नसल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीही अनुभवने सोशल मीडियावर एक । व्हिडिओ पोस्ट करून वर्षाबाबत धक्कादायक खुलासे केले होते.



या व्हिडिओमध्ये अनुभवने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गुपिते उघड केली होती. अनुभव म्हणाला होता की लग्नाला 8 वर्षे झाली पण पत्नीने शारीरिक संबंध ठेवू दिले नाही. अनुभवने सांगितले की, मी मानसिक तणावातून जात आहे. आणखी किती दिवस वाट पाहायची?



अनुभव आणि वर्षा यांच्यात घटस्फोट होण्यामागे हेच प्रमुख कारण आहे. अनुभवने पत्नीकडे। घटस्फोट मागितला आहे. दोघांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. वर्षा आणि अनुभव यांचे 2014 मध्ये लग्न झाले . लग्नानंतर काही दिवसांपासून त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

वर्षा आणि अनुभवचे प्रकरण सोशल मीडियावर गाजत आहे. या प्रकरणात सत्य काय आहे, कोण बरोबर आहे, हे माहीत नाही, पण लोकांच्या चर्चेला मात्र उधाण आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -