ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 76 आणि 152 पंचायत समित्यांच्या मतदारसंघाची प्रारुप रचना जाहीर करण्यात आली आहे. नव्या प्रारुप रचनेनुसार झेडपीचे 9, तर पंचायत समित्यांच्या 18 मतदारसंघांची वाढ झाली आहे. नव्या प्रारुप रचनेत काही गावांची अवस्था ही मला नाही तर घाल कुत्र्याला अशी झाली आहे. तर या गावांचे तुकडे पाडण्यात आली आहेत.
नव्या प्रारुप रचनेत करवीर तालुक्यामध्ये 2 मतदारसंघ वाढले आहेत. तर गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि गडहिंग्लज या तालुक्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. बाकी 7 तालुक्यांमध्ये झेडपीचा एक गट वाढला आहे, तर पंचायत समित्यांमध्ये 18 मतदारसंघांची वाढ झाली आहे. मात्र कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे प्रभाग रचना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिल्याच दिवशी 15 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर भौगोलिक संलग्नता न राहता राजकीय दबावातून प्रभाग रचना झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल
जिल्हा परिषदेच्या 76 आणि 152 पंचायत समित्यांच्या मतदारसंघाची प्रारुप रचना जाहीर करण्यात आली आहे. नव्या प्रारुप रचनेनुसार झेडपीचे 9, तर पंचायत समित्यांच्या 18 मतदारसंघांची वाढ झाली आहे. नव्या प्रारुप रचनेतनंतर वादाला तोंड फुटले आहे. तर याच्याआधीच प्रभाग रचनेवरून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला होता. तसेच त्यांनी भौगोलिक संलग्नता टाळून राजकीय दबावाखाली चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केल्याचा आरोप केला होता. तर आता त्यांनी त्याचा पुरोच्चार करताना, चुकीचा प्रभाग रचने विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा नरके यांचा इशारा दिला आहे. तसेच पैशाच्या जोरावर जिल्ह्याचे राजकारण चुकीच्या दिशेला नेले जात असल्याचं नरके म्हटलं आहे. तर नरके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.