‘राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार असे चंद्रकांतदादा म्हणत असतील, तर त्यांनाच कदाचित घोडेबाजार सुरू करायचा असेल आणि त्यासाठीच ही निवडणूक लादताहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्रात सर्वदूर सगळ्यांना वाटतेय, अशा शब्दांत सामाजिक न्याय धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध – चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
राज्यात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असे विधान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते साताऱ्यातील डिस्कळ इथल्या एका सभेत बोलत होते. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आले आहेत.
सामाजिक न्यायमंत्री मुंडे आज कोरेगाव मतदारसंघात दौऱ्यावर आले असताना आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘घोडेबाजार होणार असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? या पत्रकारांच्या प्रश्नावर मंत्री मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. श्री. मुंडे म्हणाले, “राज्यसभेच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार होते. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे एकंदरीत दिसत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानात व विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानात फरक आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचे मतदान संबंधित पक्षाच्या गटनेत्याला दाखवून करावे लागते, तसा कायदा आहे. विधान परिषदेसाठी तसे नाही.’ नगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
मनसेकडून वेगळीच मागणी होत आहे, यावर प्रतिक्रिया विचारली असता, श्री. मुंडे म्हणाले, “कोणी काय मागणी करावी, हा लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसार प्रत्येकाला अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणीही ही मागणी केली असली, तरी ती गैर नाही; परंतु मागच्या पाच वर्षांत नगर जिल्ह्याच्या तत्कालीन मंत्र्यांनीही ही मागणी केली होती. त्या वेळी मागणी का पूर्ण केली नाही, याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने दिले, तर बरे होईल. त्यानंतर ही मागणी करावी आणि तसा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारकडे द्यावा.’ कोणी भोंग्याचा विषय काढतंय, कुणी हनुमान चालिसाचा विषय काढतंय, सर्वच गोंधळ आहे, असा टोला मंत्री मुंडे यांनी मनसेसह भाजपवर लगावला.