Homeकोल्हापूरKolhapur : चोवीस तासांत 110 ठिकाणी झाडे हटविल्याची नोंद

Kolhapur : चोवीस तासांत 110 ठिकाणी झाडे हटविल्याची नोंद

शिवाजी पार्क, राजारामपुरी, नागाळा पार्क, कळंबा यासह शहरात विविध ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना गुरुवारी घडल्या. अनेक ठिकाणी झाडे तसेच फांद्या हटविण्यासाठी 24 तासांहून अधिकचा वेळ गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. महापालिका अग्निशमन दलाने गेल्या चोवीस तासांत 110 ठिकाणी झाडे हटविल्याची नोंद झाली आहे.

वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी झाडे कोसळली होती. रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी कोणतीही मदत पोहोचली नव्हती. तसेच ही झाडे विजेच्या तारांवर पडल्याने या ठिकाणी जाणेही धोकादायक बनले होते. यामुळे रात्री या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होती त्या ठिकाणी तत्काळ झाडे हटविण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -