Friday, January 30, 2026
Homenewsविजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू

बोअरची मोटार सुरू करताना विजेचा धक्का बसून नववीत शिकणार्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. अंकिता अनिल शेळके (वय 15, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. रंकाळा स्टँड परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. मुलीच्या मृत्यूप्रकरणी बांधकाम साईट अभियंता संदीप संकपाळ (रा. ताराबाई पार्क) याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संकपाळ याचे रंकाळा बसस्थानक परिसरात बांधकाम सुरू आहे. मुलीची आई नूतन अनिल शेळके बांधकामावर वॉचमन व पाणी मारण्यासाठी कामाला आहे.

बांधकामावरील बोअर मीटरमध्ये आठवड्यापासून विद्युत प्रवाह होत असल्याने तातडीने दुरुस्ती करून घेण्याबाबत नूतन शेळके यांनी संकपाळ यांना वारंवार सांगितले होते. तथापि, त्यांनी हलगर्जीपणा केला. मीटरची दुरुस्ती केली नाही. रविवारी सकाळी 10 वाजता अंकिता इलेक्ट्रिक बोर्डचे बटण सुरू करीत असतानाच विजेचा जोराचा धक्का बसला. त्यातच तिचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -