राजकीय संवेदनशील असलेल्या कोरोची ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली. विस्तार अधिकारी एन. आर. रामण्णा, तलाठी अनंत दांडेकर, ग्रामविकास अधिकारी राजू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत काढण्यात आली. निवडणूक आयोगाने महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित केल्या. कोरोची ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण १७ जागांसाठी सहा प्रभागांसाठी आरक्षण काढले
प्रभाग १: सर्वसाधारण स्त्री १ व सर्वसाधारण २, प्रभाग २ सर्वसाधारण स्त्री २, सर्वसाधारण १. प्रभाग ३ सर्वसाधारण – स्त्री १, सर्वसाधारण १, प्रभाग ४ अनुसूचित जाती (सर्वसाधारण) १, सर्वसाधारण स्त्री ९. सर्वसाधारण १ प्रभाग ५ अनुसूचित जाती स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, सर्वसाधारण १. प्रभाग ६- अनुसूचित जाती स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, सर्वसाधारण १ असे आरक्षण जाहीर केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. देवानंद कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. संतोष भोरे, उपसरपंच आनंदा लोहार, माजी सरपंच डी. बी. पिष्टे , सर्जेराव माने, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, आनंदा शेट्टी, अमर पाटील, लखन कांबळे, शीतल पाटील आदी उपस्थित होते.