Sunday, February 22, 2026
Homeसांगलीसांगली : प्रियसीची या कारणामुळे केली निर्घुण हत्या

सांगली : प्रियसीची या कारणामुळे केली निर्घुण हत्या

सांगली जिल्ह्यातील खानापूर येते एका विवाहितेची निघृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. या विवाहितेचा मृतदेह सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्ड गावातील येरळा नदी पात्रात आढळला. सदर सडलेल्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर तो खानापूरच्या बलवडी येथील ताई सचिन निकम हिचा असल्याचे उघड झाले.

सदर प्रकरणात पोलिसांनी तपास यंत्रणा फिरवण्यास सुरुवात केली. तपासाअंती मृत ताई सचिन निकम हिचा प्रियकर संशयित आरोपी राहुल सर्जेराव पवार याला पोलिसांनी खानापूर तालुक्यातील विटा येथील सावरकरनगर येथून अटक केली. या प्रकरणाबाबत चौकशी केली असता त्यानेच तिच्या प्रियसीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचे कबूल केले.

तसेच खूनाचा धक्कादायक कारणही समोर आले आहे. राहुल पवार याचे ज्वेलर्सचे दुकान आहे. यामुळे प्रियसीने त्याच्याकडे एक ग्रॅम सोन्याच्या अंगठी मागितली होती. मात्र राहुलने त्यास नकार दिला. यामुळे त्यांच्यातील प्रेमसंबंधांची माहिती त्याच्या वडिलांना देईल, अशी धमकी तरुणीने दिली होती. या रागातून राहुलने प्रियसीची निघूण हत्या केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -