महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एचएससी) एमएसबीएसएचएसई, महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ घोषित करण्यासाठी सज्ज आहे. मात्र इयत्ता दहावीचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. कारण बोर्ड आज, १५ जूनला महाराष्ट्र एसएससी निकाल घोषित करणार नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र आज एसएससी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या शिक्षण मंडळाच्या घोषणेनंतर तब्बल १६ लाखहून अधिक एसएससीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही आठवड्यांपूर्वी सांगितले की, इयत्ता दहावीचा निकाल हा १५ जूला जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापही निकालाची तारीख निश्चित झाली नाही. यामुळे येत्या २० जूनला निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या तारखेवरही शंका व्यक्त करण्यात येत आहे.