ताजी बातमी ऑनलाईन टीम
ऑनर किलिंगच्या एका घटनेने धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. साक्री तालुक्यातील हट्टी गावात खोट्या प्रतिष्ठेमुळे भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपासाची चक्र फिरवत आरोपी भावाच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. बहीण तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्यामुळे समाजात प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याच्या रागातून आपण तिला संपवलं, असं आरोपीने कबूल केलं आहे.
संदीप रमेश हालोर असे आरोपी भावाचे नाव आहे. तर पुष्पा रमेश हालोर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव होते. आरोपीने त्याच्या मित्राच्या मदतीने पुष्पाचा शोध घेऊन तिची हत्या केली. नंतर तिनेच आत्महत्या केल्याचा बनाव केला. परंतु, त्याचं खोटं पोलिसांसमोर जास्त वेळ टिकलं नाही. पोलिसांना काही तासांतच या हत्येचे रहस्य उलगडे आहे.
काय आहे प्रकरण?
साक्री तालुक्यात असलेल्या हट्टी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. रमेश हालोर यांच्या कन्या पुष्पा हिचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. संदीप हालोर याने आपल्या बहिणीला अनेकदा समजावले. परंतु ती प्रियकराला सोडण्यास तयार नव्हती. आई-वडील आणि भावाचा लग्नाला विरोध असलाने पुष्पाने प्रियकरासोबत पलायन केले. त्यामुळे संदीप हालोर आणखीच संतापला. त्याने मित्रांच्या मदतीने पुष्पाचा शोध घेतला.








