ताजी बातमी ऑनलाईन टीम
रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्या सांगोल्यामधल्या आरोपानंतर राज्य सरकारकडून सुरक्षा दिली आहे. खोत यांच्याबरोबर शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना सरकारने सुरक्षा दिली आहे.
सरकारने सुरक्षा तैनात केली आहे, पण आमचं संरक्षण आम्ही करू शकतो असं सदाभाऊ खोत म्हणाले. काल पत्रकार परिषदेत त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.सदाभाऊ म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना दरोडेखोर आणि खंडणीखोरांची आहे.त्यांनी जरूर आंदोलन करावे पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अलीकडे आंदोलन कशावर करावे हे सुधारत नाही.
आजी सांगत होती की गाढव टांग मारून हसायला लागत त्याची प्रचिती आज मला येत आहे असा टोलाही त्यांनी लगावला. हॉटेलचालक शिनगारे हे स्वाभिमानीचे कार्यकर्ते होते, असे राजू शेट्टी यांनी संबंधित हॉटेलवाल्याबद्दल मा दिली आहे. यावरुन सदाभाऊंनी राजू शेट्टी यांच्याव ^ निशाणा शाधला.