करमाळा तालुक्यातील साडे येथील बंद घर फोडून चोरट्याने 53 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत सत्यवान गोरख घाडगे (वय 26) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाडगे हे 18 जून रोजी सकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटामध्ये ठेवलेले सोन्याची अंगठी, रोख रक्कम असा 53 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. अशी नोंद करमाळा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हवालदार शेख पुढील तपास करीत आहेत.