Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगशिवसेनेचे पाच माजी आमदार गोव्यात! चर्चा मात्र कोल्हापुरात

शिवसेनेचे पाच माजी आमदार गोव्यात! चर्चा मात्र कोल्हापुरात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच माजी आमदार गोव्याला एकत्र सहलीवर गेल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजीत मिणचेकर, उल्हास पाटील व सत्यजित पाटील यांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांचा एक गट घेऊन गुजरातमध्ये गेल्याने राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर नॉट रिचेबल आहेत. त्याची चर्चा सुरू असतानाच जिल्ह्यातील पाच आमदार एकाचवेळी गोव्याला सहलीवर गेल्यामुळे चर्चेचा उधान आले आहे. शिवसेना अडचणीत आली असताना जिल्ह्यातील या पाच माजी आमदारांच्या गोवा वारीकडे संशयाने पाहिले जात आहे.

गोव्यातून ते परत कोल्हापूरला येणार की आणखी कुठे जाणार? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. यासंदर्भात एका आमदाराशी संपर्क साधला असता, आमची ही सहल पुर्वनियोजित होती. सोमवारी सकाळीच आम्ही गोव्यात आलो आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही शिवसेनेसोबतच असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -