Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगजुलैमध्ये 16 दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

जुलैमध्ये 16 दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

जून महिना संपून जुलै सुरू होण्यासाठी केवळ काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे तुम्हाला जर जूलैमध्ये बँकेत काही काम असेल तर बँकांच्या सुट्ट्याविषयी (Holidays in July 2022) माहिती असणे गरजेचे आहे. आरबीआयच्या याा यादीनुसार जुलैमध्ये एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. या 16 बँक सुट्ट्यांमध्ये 5 रविवारच्या साप्ताहिक सुटट्यांचाही (Bank Holidays Dates in July) समावेश आहे. तर इतर काही दिवशी प्रादेशिक सणांमुळे बँका बंद राहतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार (RBI) बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या असतात. फक्त प्रत्येक दूसरा शनिवार आणि सर्व रविवारीची सुट्टी समान असते. याशिवाय सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व बँका बंद राहतात. जूलै महिन्यात राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये स्थानिक सण/उत्सवांमुळे सुट्ट्या आहेत. यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे. जाणून घेऊया जुलै महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत.

1 जुलै 2022 : कांग रथयात्रा – भुवनेश्वर आणि इंफाळमध्ये बँकांना सुट्टी असेल.
3 जुलै 2022 : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
5 जुलै 2022 : गुरु हरगोविंदांचा प्रकाश दिन (जम्मू आणि काश्मीर)
6 जुलै 2022 : एमएचआयपी दिवस (मिझोरम)
7 जुलै 2022 : खर्ची पूजा (आगरतळामध्ये बँक बंद)
9 जुलै 2022 : ईद-उल-अधा (बकरीद) आणि महिन्याचा दुसरा शनिवार.
10 जुलै 2022 : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
11 जुलै 2022 : इज-उल-अजा ( जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक बंद)

13 जुलै 2022 : भानु जयंती (गंगटोक बँक बंद)
14 जुलै 2022 : बेन दियानखलम (शिलाँग बँक बंद)
16 जुलै 2022 : हरेला (देहरादून येथे बँक बंद)
17 जुलै 2022 : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
23 जुलै 2022 : महिन्याचा चौथा शनिवार असल्याने सुट्टी असेल.
24 जुलै 2022 : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
26 जुलै 2022 : केर पूजा (आगरतळामध्ये बँक बंद)
31 जुलै 2022 : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.

हे देखील लक्षात ठेवा
हे लक्षात ठेवा की ज्या दिवशी बँका बंद असतील त्या दिवशीही बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करता येतात. कारण बँकांच्या सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन सेवा वर्षभर सुरू राहतात. याद्वारे तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित अनेक कामांचा निपटारा करू शकता. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी फक्त बँक शाखा बंद असतात. तर एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिंटिंग मशीन, ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -