Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरभादोलेतील एकास ६६ हजारांचा गंडा

भादोलेतील एकास ६६ हजारांचा गंडा

इलेक्ट्रिक गाडीसाठी बुकिंग करून दहा दिवसांत गाडी देतो असे सांगून एकाला ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितले. बँक खात्यावरून ६५ हजार रुपये पाठविले. मात्र, गाडी न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर भादोले (ता. हातकणंगले) येथील सुजित दिलीप पाटील याने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

भादोले येथील सुजित पाटील याने ऑनलाईन गाडी खरेदीबाबतची माहिती घेत होता. शोध घेत असता त्याला एक मोबाईल नंबर मिळाला. त्यावर संपर्क केला असता त्याला इलेक्ट्रिक गाडी कशी घ्यायची ते सांगून कंपनीची ऑनलाईन कागदपत्रे पाठविली. सुजित यांनी त्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर बुकिंगसाठी सुजितने संबंधिताच्या बँक खात्यावर २० हजार ५०० रुपये पाठविले. पुन्हा त्याने गाडीचे ४५ हजार भरा म्हणून सांगून कॉल केला व त्याशिवाय गाडी मिळणार नाही असे सांगितले. यामुळे बुकिंगसाठी भरलेले पैसे बुडणार म्हणून त्याने थोडे थोडे पैसे पाठवित ४५ हजार ५०० रुपये पाठविले.

सुजित पाटील यांनी आपल्या दोन्ही खात्यावरुन एकूण ६६ हजार रुपये पाठविले. पैसे पाठविल्यानंतर पुन्हा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ज्या खात्यावर पैसे पाठविले ते कॅनरा बँक व जाना स्मॉल फायनान्सच्या दोन्ही खात्यांची माहिती घेतली असता ही खाती बनावट असल्याची माहिती मिळाली. संबंधित कंपनीचा बनावट इमेल आयडी व पेजही बनावट तयार केले आहे. पेठवडगाव परिसरातही काहीजणांची कंपनीची एका इलेक्ट्रिक गाडी देत असल्याचे सांगून फसवणूक झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -