Monday, July 7, 2025
Homeतंत्रज्ञानFacebook-Instagram यूजर्सवर पडणार पैशांचा पाऊस; ‘या’ फीचरमधून मिळणार पैसे

Facebook-Instagram यूजर्सवर पडणार पैशांचा पाऊस; ‘या’ फीचरमधून मिळणार पैसे

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर मागील काही वर्षांपासून कमालीचा वाढला आहे. मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबातले सदस्य, कार्यालयीन सहकारी आदींशी कनेक्ट राहण्यासाठी आणि इतर काही घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतो.

विशेषतः फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आता इथून पुढं फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केवळ शेअरिंगच नाही तर कमाई देखील करता येणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक कमाई करण्याचे नवे मार्ग मागील काही दिवसांमध्ये मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले आहेत. या फीचर्समध्ये प्रामुख्याने फेसबुक स्टार्स, मोनेटायझिंग रील्स आणि इंटरऑपरेबल सब्सक्रिप्शनचा समावेश असणार आहे. डिजिटल कलेक्टीबिलीज हे यापैकी एक फीचर आहे. कंपनी इन्स्टाग्रामवर एनएफटी डिस्प्लेसाठी तसंच जास्त क्रिएटर्सच्या सपोर्टसाठी प्रयत्नशील आहे.

मार्क झुकरबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार मेटानं इन्स्टाग्रामवर या फीचरचं टेस्टिंग सुरु केलं आहे. या माध्यमातून आता क्रिएटर्सना सर्च आणि पेमेंट केलं जाईल. यामधून विविध ब्रॅंड पार्टनरशीपच्या नव्या संधी शेअर करता येतील. इंटरऑपरेबल सब्सक्रिप्शन फीचरच्या माध्यमातून सब्सक्रायबरनं ज्या क्रिएटरसाठी पेमेंट केलं आहे, अशा सब्सक्रायबरला Subscribe-only Facebook Groupsमध्ये प्रवेश देण्यात येईल असं देखील कंपनीनं म्हटलं आहे.

अधिकाधिक लोकांना रील्स, लाईव्ह किंवा व्हिडिओच्या माध्यमातून कमाई करता यावी यासाठी हे फीचर आम्ही तयार केलं आहे असं मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे. मार्क झुकरबर्ग यांनी केलेल्या या घोषणेनंतर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होणार आहे अशी आशा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -