Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञानWhatsApp मध्ये झालेत ‘हे’ बदल; जाणून घ्या, प्रत्येक बदललेल्या फीचरची माहिती

WhatsApp मध्ये झालेत ‘हे’ बदल; जाणून घ्या, प्रत्येक बदललेल्या फीचरची माहिती

WhatsApp हे जगभरात अत्यंत लोकप्रिय झालेलं ऑनलाईन चॅटिंग प्लॅटफॉर्म आहे. आपल्या कोट्यावधी यूजर्सचा चॅटिंग अनुभव अधिक शानदार बनवण्यासाठी WhatsApp हे सतत प्रयत्नशील असतं. मागील काही दिवसांमध्ये WhatsAppने आपल्या अपडेटमध्ये ग्राहकांना नवीन फीचर्स दिले आहेत. यामध्ये युजर्सच्या सुरक्षेसाठी आणि प्रायव्हसीसाठी मोठं काम केल्याचं समोर आलं आहे. प्रोफाइल फोटो, लास्ट सीन आणि स्टेट्स हे फीचर्स युजरकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. कंपनीने अकाउंट्सच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये बदल करू लास्ट सीन, स्टेट्स आणि प्रोपाइल पिक्चरसाठी My contacts except चा पर्याय आता दिला आहे.

या पर्यायावर जाऊन तुम्ही ज्यांना डिटेल्स दाखवायचे नाही, ते कॉन्टॅक्ट्स निवडू शकता जेणेकरून तुमचा फोटो, लास्ट सीन इत्यादी गोष्टी त्या विशिष्ट कॉन्टॅक्टला दिसणार नाहीत. डिसअपेअरिंग मेसेज हे देखील फिचर लोकांना आवडत आहे. डिसअपेअरिंग मेसेज या फीचरला ऑन केल्यास सेंड केलेले मेसेज आपोआप डिलीट होतात. हे मेसेजेस डिलीट करण्यासाठी कंपनी 24 तास, 7 दिवस, 90 दिवस असे विविध पर्याय देत आहे.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हे फिचरदेखील WhatsApp ने काही दिवसांपूर्वी लाँच केले होते. या फीचरचा उपयोग चॅटला लीक होण्यापासून वाचवणे आहे. हे फीचर मेसेजला सेंडर आणि रिसिव्हरपर्यंतच मर्यादित ठेवते आणि कोणत्याही थर्ड पार्टीला मेसेजला अ‍ॅक्सेस करता येणार नाही याची काळजी घेते.

प्रायव्हसी फीचरच्या बाबतील केलेल्या बदलानुसार इतरांना केवळ तुम्ही आधी चॅट केलेल्या यूजर्सलाच तुमचा लास्ट सीन दिसेल. सदरील युजर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह आहे, परंतु चॅट केलेले नसेल तर अशा यूजर्सला लास्ट सीन दिसणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -