Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्रमोबाइल चोरण्यासाठी पंढरपूरच्या वारीत घुसले, पुणे ग्रामीण पोलिसांनी जेलच्या वारीत धाडले

मोबाइल चोरण्यासाठी पंढरपूरच्या वारीत घुसले, पुणे ग्रामीण पोलिसांनी जेलच्या वारीत धाडले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पुणे : पंढरपूरच्या वारीत चोरी करण्यासाठी आलेल्या झारखंडमधील चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पंढरपूर वारी आणि पालखी मिरवणुकीत वारकऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी पुण्यात आलेल्या झारखंडमधील तीन अल्पवयीन . मुलांसह सहा जणांचा यात समावेश आहे.


आंतरराज्य टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. अटक करण्यात आलेले तीन संशयित, सोमरा नगर मोरी (26), आकाश दिलीप मोरी (25) आणि चंदन नगर मोरी (22) आणि हे तीन अल्पवयीन झारखंडमधील सरायकेला खरसावन जिल्ह्यातील एका गावातील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून सुमारे 14 लाख रुपये किंमतीचे तब्बल 101 चोरीचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. 24 जून रोजी पुणे । जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील अमर सोसायटीतून मोबाइल चोरीला गेल्याच्या कॉलला दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -