Friday, November 22, 2024
Homeआरोग्यविषयक'या' फळांना फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करू नका

‘या’ फळांना फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करू नका


आपण बऱ्याच वेळा फ्रिजमध्ये फळं ठेऊन देतो. जेणेकरून ती खराब होऊ नये. पण फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने तुमचं नुकसान होतं याची तुम्हाला कल्पना आहे. बऱ्याच वेळा फळे फ्रिजची थंडता सहन करू शकत नाहीत आणि यामुळे फळांमध्ये असलेले पोषक घटक नष्ट होऊ लागतात.


खरबूज आणि टरबूज यांच्यासारखी फळे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट नष्ट होतात. जर तुम्हाला फळे फ्रिजमध्ये ठेवायची असतील तर ती जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नका.


संत्र आणि लिंबू
फ्रिजमध्ये सायट्रिक अॅसिड असलेली फळं ठेवल्याने त्यांचे पोषक घटक कमी होतात. शिवाय या फळांची चवही खराब होते.
आंबा
आंबा चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नये. आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट असून ते कमी होण्याची शक्यता दाट असते.
लिची
फ्रिजमध्ये लिची ठेवल्याने त्याची साल ताजी दिसेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का ते फळ आतून खराब होतं. फ्रिजचे कृत्रिम शीतकरण फळाचं नुकसान करतात.
सफरचंद
सफरचंद, प्लम आणि चेरी सारखी फळं देखील फ्रीजमध्ये ठेवू नयेत. या फळांमध्ये अधिक सक्रिय एंजाइम असतात आणि ते फ्रिजमध्ये ठेवल्याने ते अतिप्रमाणानंतर खूप लवकर खराब होतात.
केळे
केळीच्या देठापासून इथिलीन वायू बाहेर पडतो. ज्यामुळे केळी जलद गतीने काळी होऊ लागते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर खराब होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -