Sunday, December 22, 2024
Homenewsसांगली : जिल्ह्यात ‘ई’ चलनाद्वारे 51 लाखांचा दंड

सांगली : जिल्ह्यात ‘ई’ चलनाद्वारे 51 लाखांचा दंड


जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 8 हजार 554 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना 51 लाख 74 हजार 300 रुपयांचा दंड करण्यात आलेला आहे. हा दंड अद्याप त्यांच्याकडून प्रलंबित आहे. या संदर्भात काही शंका किंवा तक्रार असेल तर त्यांनी वाहतूक शाखेमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांत सांगली-मिरज शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढलेली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. अपघात वाढत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी व अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस दोषींवर कारवाई करीत असतात.
वाहतुकीस शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. आता वाहतूक पोलिसांच्या मदतीला आधुनिक तंत्रज्ञानसुद्धा आलेले आहे. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसाने दंडाची रक्कम मागणी केल्यास अनेक वेळा संबंधित पोलिसाबरोबर वाद घातला जातो. त्यामुळे अशा नियमाचे उल्लंघन केलेल्या वाहनांचा फोटो काढून तो वेबसाईटवर अपलोड करण्यात येेतो. वेग मर्यादा ओलांडने, नो पार्किंगमध्ये गाडी, ओहरलोड आदी वाहतुकीचे नियम उल्लंघन केलेल्यांना हा दंड करण्यात आला आहे.
संबंधिताच्या मोबाईलवर मेसेज पाठवण्यात येणार आहे. आतापर्यंत सुमारे आठ हजार 554 जणांकडून नियमाचे उल्लंघन झाल्याचे पुढे आले आहे. ज्या वाहनांचे नंबरला मोबाईल नंबर अटॅच आहेत. त्या मोबाईलवर या दंडाचा मेसेज पाठवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात काही तक्रारी किंवा शंका असेल त्यांनी वाहतूक नियंत्रण शाखा विश्रामबाग, मिरज, विटा, तासगाव , इस्लामपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
पोलिसांनाही दंडाचा दणका
काही नागरिकांनी पोलिसांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन केलेले फोटो अॅपवर डाऊनलोड केले होते. त्यावर वाहतूक शाखेच्या प्रमुख प्रज्ञा देशमुख यांनी त्या संबंधित दोषी पोलिसांवरसुद्धा दंडात्मक कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -