Sunday, August 10, 2025
Homeसांगलीसांगली जिल्ह्यात पुन्हा गव्याची एन्ट्री

सांगली जिल्ह्यात पुन्हा गव्याची एन्ट्री

शिगाव तालुका वाळवा येथे फारणेवाडी रोडवर सकाळी गवा दिसल्याने शेतकरी व शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.गावचे सरपंच उत्तम गावडे व त्यांचे सहकारी यांनी पोलीस प्रशासन,वन विभाग यांना कळवले आहे. वन विभागाची टीम पोहचत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पण शिगाव गावात गवा आलाच कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

काही दिवसांपूर्वी वडगाव ता हातकणंगले येथे गवा दिसला होता. त्यानंतर वडगाव परिसरात गव्याचा चक्क कळपच दिसला होता. कदाचित त्यातीलच एक गवा नदी ओलांडून किंवा पुलावरून पहाटे शिगाव गावात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गव्याने कोणालाही नुकसान पोहचवले नाही.सध्या गवा शिगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील ऊस शेतीत बसला आहे अशी माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -