कुंभोज (ता. हातकणंगले) येथे मार्च २०२१ मध्ये घरामध्ये कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या अक्षय आण्णासोो हिंगलजे (वय २५), रोहित लालासो पुजारी (वय २१), राहुल संजय थोरात (वय २१, तिघे रा. कुंभोज) या संशयितांना हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले पोलिसांनी कुंभोज स्टँड परिसरातून या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांकडून सोने जप्त केले आहे
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -