मुंबई, शिवसेनेत बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि त्यांच्या मित्र पक्षांना धक्का देण्यास सुरुवात केली आहे. आरे कॉलनीतील रद्द करण्यात आलेले मेट्रो कार शेड तेथेच होणार असल्याची घोषणा करत शिवसेनेला दणका दिला. यानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नियोजनाच्या ६०० कोटी कामांना थांबवत माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत राष्ट्रवादीला सुद्धा जोरदार दणका दिला आहे.
छगन भुजबळ यांनी कार्यसमितीची बैठक घेऊन नाशिक जिल्ह्यातील नियोजनाच्या कामांना ५६७ कोटी मंजूर करण्यात आले होते. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच एकनाथ शिंदे यांनी घाईगडबडीत कामांना मजुरी कशाला असा सवाल नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारात या कामांना ब्रेक लावला आहे. अशा प्रकारे निर्णय घेऊन हा थेट छगन भूजबळ यांच्यासह राष्ट्रवादीला दणका दिल्याचे मानले जात आहे.
Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा दणका; ६०० कोटींच्या कामाला दिली स्थगिती
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -