Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : व्हीनस कॉर्नर परिसरात मद्यपींचा उच्छाद

कोल्हापूर : व्हीनस कॉर्नर परिसरात मद्यपींचा उच्छाद

ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; व्हीनस कॉर्नर परिसरात सध्या तळीरामांचा अड्डा बनल्याचे चित्र आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारी हॉटेल, खाऊ गाडे तसेच दारू दुकानांसमोर मद्यपींचा उच्छाद दिसून येतो आहे. किरकोळ कारणावरून वाहनांची तोडफोड होत असल्याच्या तक्रारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.,

दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर मार्गावर अनेक ठिकाणी रात्री मद्यपींचा वावर दिसतो. जुना पूल, गाडी अड्डा, व्हीनस कॉर्नर चौक, अप्सरा टॉकीज, उषा टॉकीज अशा ठिकाणी खुलेआम तळीराम मद्यप्राशन करताना नजरेस पडतात. गाडी अड्ड्याच्या जागेत तर रात्री मोठी मैफील जमते. येथे दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला मिळून येतो. तसेच रिकामा बाटल्या फोडल्याने रहिवाशांनाही याचा त्रास होतो आहे.

व्हीनस कॉर्नरजवळील एका बारशेजारी लावलेल्या मोपेडचे लाथाबुक्क्यांनी नुकसान करण्यात आले. एका मद्यपीने केलेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यापूर्वीही अनेकदा याच ठिकाणी मद्यपींचा त्रास होत असल्याच्या तक्रार शाहपुरी पोलिसांकडे आल्या असल्या तरी ठोस कारवाई होत नसल्याचे स्थानिक सांगतात.

महिलांसाठी असुरक्षित
उषा टॉकीज, कोंडा ओळ, जुना पूल परिसरात रिक्षा थांबे, बस थांबे आहेत. मात्र, या ठिकाणीही अनेक मद्यपी रात्री थांबलेले असतात. अशाठिकाणी महिला प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -