Friday, August 1, 2025
Homeसांगलीम्हैसाळ हत्याकांड प्रकरण : मांत्रिक, साथीदाराला न्यायालयीन कोठडी

म्हैसाळ हत्याकांड प्रकरण : मांत्रिक, साथीदाराला न्यायालयीन कोठडी

म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबीयांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या मांत्रिक आब्बास बागवान आणि त्याचा साथीदार धीरज सुरवशे या दोघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

गुप्तधन शोधून देण्याच्या आमिषाने मांत्रिक आब्बास बागवान याने डॉ. माणिक वनमोरे आणि निवृत्त शिक्षक पोपट वनमोरे या दोघांकडून लाखो रुपये घेतले होते. परंतु गुप्तधन काही मिळाले नव्हते. त्यामुळे दिलेले पैसे परत देण्यासाठी वनमोरे यांनी बागवान याच्याकडे तगादा लावला होता. त्यातून मांत्रिक आणि साथीदाराने हे हत्याकांड घडवून आणले होते. पोलिसांनी तपास करून मांत्रिक बागवान आणि साथीदार सुरवशे याला अटक केली होती. तपासादरम्यान मांत्रिक बागवानने ‘तो मी नव्हेच’ चा पवित्रा घेतला असला तरी पोलिसांनी सोलापुरातून त्याच्या विरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले असल्याचे सांगितले.
तपासासाठी बागवान याची न्यायालयाने दोन वेळा पोलिस कोठडी दिली होती. त्याची कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. सोमवारी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. बागवान याने वनमोरे यांच्याकडून किती रुपये घेतले हे मात्र अद्याप समजू शकले नाही. बागवान याची बहीण अद्याप फरारी असून तिला अटक केल्यानंतर तिच्याकडून देखील आणखीन माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Forwarded message
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -