ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा मे महिन्यात झाली. या परीक्षेचा निकाल दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) शुक्रवारी ऑनलाइन जाहीर झाला. कोल्हापूर विभागातून ३१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३१ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होवून बाजी मारली आहे. या विभागातून गांधीनगरमधील सुमित नंदलाल नेचलानी याने प्रथम क्रमांक पटकविला. मंडलिक पार्कमधील ऋचा सतीश परांजपे हिने द्वितीय, तर राजारामपुरी दुसरी गल्लीतील सबा नियाज मोर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
कोल्हापूर विभागात पाचगावमधील सौरभ एकनाथ भोपळे याने चौथा आणि राजारामपुरी १२ वी गल्लीतील अपूर्वा अनूप मेंच हिने पाचवा क्रमांक मिळविला. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यात कोल्हापुरातील विद्यार्थ्यांचा टक्का वर्षागणिक वाढत आहे. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमृता विश्वास सूर्यवंशी, ऐश्वर्या सचिन सातार्डेकर, आदित्य अरुण बाहेती, यश शिवराम कुलकर्णी, किमया गोपाळ गर्दै, यश हेमंत सोनशेट, रसिका चंद्रकांत मार्ले, पवन बाजीराव सावंत, प्रतीक्षा मिलिंद ओक, विनिता प्रशांत मिरजे,पढारकर, अपूर्वा कल्लाप्पा गगाइ, निरजा मानासग घाटग, अभिषेक गिरीधर कानडे, रेवती विवेक कारंडे, अंकिता संजय खोपडे, उमेश हिंदुराव राऊत, भक्ती विजय ओसवाल, ओंकार सदाशिव चरापले, नम्रता निवास पाटील, कुणाल राजेंद्र पिसाळ, ऋतुजा भिवाजी गाडगीळ, सुशांत पाटील आणि श्रेया झावरे यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.