Thursday, June 26, 2025
HomeमनोरंजनSushmita Sen सोबतच्या अफेअरवर उघडपणे बोलले Lalit Modi; ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर,...

Sushmita Sen सोबतच्या अफेअरवर उघडपणे बोलले Lalit Modi; ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर, म्हणाले…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. सुष्मिता सेन आणि आयपीएलचे (IPL) माजी चेअरमन ललित मोदी हे सध्या त्यांच्या लव्हस्टोरीमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिली त्यानंतर सोशल मीडियावर सध्या दोघांचाच बोलबाला सुरु आहे. ललित मोदी तर वारंवार आपल्या पोस्टद्वारे सष्मितावरील प्रेम व्यक्त करत आहेत. ऐवढेच नाही तर दोघांनी लग्न केल्याची देखील चर्चा होती. पण त्यांनी लग्नाच्या बातम्या फेटाळून लावल्या. दोघांच्या या अफेअरच्या चर्चानंतर आता सोशल मीडियावर ललित मोदी यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. पण नुकताच ललित मोदीसोशल मीडियावर भली मोठी पोस्ट करत आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलले आहे. तसंच त्यांनी ट्रोलर्सचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे.

ललित मोदींनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर करत एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, ‘मीडियाला मला ट्रोल करण्यासाठी इतके वेडे का झाले आहे, मला जाहीररित्या चुकीच्या पद्धतीने टॅग केले जात आहे. मला असे वाटते की आपण अजूनही मध्य युगामध्ये जगत आहोत की दोन लोकं मित्र होऊ शकत नाही आणि मग जर केमिस्ट्री योग्य असेल आणि वेळ चांगली असेल…तर मग जादू होऊ शकते, माझा सल्ला आहे जगा आणि इतरांनांही जगू द्या.’

पुढे त्याने असे लिहिले आहे की, ‘डोनाल्ड ट्रम्पच्या स्टाईलमध्ये फेक न्यूजप्रमाणे नाही…आणि जर तुम्हाला तुम्हाला माहित नसेल तर मला माझ्या आयुष्यातील सर्व दिवंगत प्रेमाचा पर्दाफाश करू द्या, मीनल मोदी 12 वर्षांपर्यंत माझी सर्वात चांगली मैत्रीण होती. तिचे लग्न झाले होते, ती माझ्या आईची मैत्रीण नव्हती, या अफवा निहित स्वार्थ असलेल्या लोकांनी पसरवल्या होत्या. या छोट्याशा विचारातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, आशा आहे की तुम्हाला याचा अर्थ कळाला असेल, कोणीतरी समृद्ध झाल्याचा आनंद घ्या.’

इतकंच नाही तर ललित मोदींनी पुढे बरंच काही लिहिलं आहे, ‘मी तुमच्याबरोबर माझं डोकं उंच ठेवतो..तुम्ही मला “फरार” म्हणता, मग तुम्ही मला सांगा की कोणत्या कोर्टाने मला “कधीही दोषी” ठरवलं आहे, मी तुम्हाला काहीही सांगणार नाही…आणि भारतातील 12-15 शहरांमध्ये व्यवसाय करणे किती कठीण आहे हे सर्वांनाच माहीत आहे…आणि मी 2008 मध्ये म्हटल्याप्रमाणे आयपीएल मंदीचा पुरावा आहे, त्यावेळी सगळे हसत होते, आता कोण हसत आहे… कारण सगळ्यांना माहित आहे की हे सर्व एकट्याने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -