Saturday, February 21, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : सर्वसामान्य जनतेवर जीएसटीचा आणखी भार!

कोल्हापूर : सर्वसामान्य जनतेवर जीएसटीचा आणखी भार!

केंद्र सरकारने जीवनावश्यक बँडेड (पॅकिंग असलेल्या) वस्तूवर 5 टक्के जीएसटी लागू केला आहे. सरकारने जीवनावश्यक बँडेड वस्तूंवर जीएसटी लागू केला असला तरी त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार आहे.

व्यापाऱ्यांनी या कराला तीव्र विरोध करूनही सरकारने या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी केली. अगोदरच महागाईने होरपळलेल्या जनतेला या निर्णयाने आणखी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

देशात 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू झाला. मात्र आत्तापर्यंत अनबॅडेड किंवा बॅडवरील अधिकार सोडून दिलेले विशिष्ट खाद्यपदार्थ, धान्य आदींवर जीएसटी लागू नव्हता. जीएसटी कौन्सिलच्या 47 व्या बैठकीत ही सवलत मागे घेण्याची शिफारस झाली. त्यानंतर केंद्र शासनाच्या अर्थमंत्रालयाने अधिसूचना काढली आणि 25 किलोच्या आतील अनबॅडेड, प्री-पॅक व प्री-लेबल अन्नधान्य व खाद्यपदार्थांना 18 जुलैपासून 5 टक्के जीएसटी लागू केला. अगोदरच महागाईने सर्वसामान्य जनता भरडून निघाली असताना पुन्हा महागाईचा वरवंटा फिरला आहे.

पॅकिंगचे अन्नधान्य, डाळी, खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी लागू झाल्याने साहजिकच वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. त्याचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर पडला आहे. महागाईत वाढ झाली आहे. शासनाने जीवनावश्यक वस्तूंवर लावलेला 5 टक्के जीएसटी मागे घ्यावा, यासाठी प्रसंगी आंदोलन तीव्र करणार असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

… या पॅक्ड वस्तूंवर जीएसटी

तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, दही, लस्सी, बटर दूध, प्री-पॅक केलेले आणि लेबल केलेले पनीर, नैसर्गिक मध, वाळलेल्या शेंगायुक्त भाज्या, रताळे आणि तत्सम मुळे आणि जास्त स्टार्च किंवा इन्युलिन सामग्री असलेले कंद, गोळ्यांच्या स्वरूपात सुका मखना, तृणधान्ये, गहू आणि मेस्लिन राई बार्ली, ओट्स, मका (कॉन) किंवा मेस्लिन पीठ गहू किंवा मेस्लिन व्यतिरिक्त तृणधान्यांचे पीठ म्हणजे मका (कॉन) लोअर, राईचे पीठ इ. तृणधान्ये, पेंड आणि गोळ्या, सुजी आणि दलिया, पेंड, पावडर, पावडर बटाट्याचे फ्लेक्स, डाळी, गवार, डिंक, साबुदाणा किंवा मुळे किंवा कंद, वाळलेल्या शेंगा, भाज्यांचे पेंड आणि पावडर, गूळ, खांडसरी साखर, साखर किंवा गूळ यांनी लेपित केलेले तांदूळ, प्रीपॅक केलेले आणि लेबल केलेले नमकीन, भुजिया, चबेना या पदार्थांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -