Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : टोल वसुली बंद करण्यासाठी मनसेचे किणी टोल नाक्यावर आंदोलन

कोल्हापूर : टोल वसुली बंद करण्यासाठी मनसेचे किणी टोल नाक्यावर आंदोलन


मुदत संपुनही सुरू असलेली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली तातडीने बंद करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने किणी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसैनिकांनी महामार्ग रोखून धरत जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडे कोल्हापूर जिल्ह्यातील किणी व सातारा जिल्ह्यातील तासवडे हे दोन्ही टोलनाके २४ जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास हस्तांतरीत करण्यात आले. त्यानंतर पुन्हा टोल वसूली सुरू करण्यात आली. या टोलसाठी सहा पदरीकरणाच्या कामाचे कारण सांगण्यात येत आहे. पण रस्ता अद्याप सहा पदरी झालाच नाही, तर टोल कशासाठी असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखालील शेकडो मनसैनिकांनी किणी टोल नाक्यावर ठिय्या मांडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -