ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; शहरातील मटण विक्रेत्यांनी गटारी अमावस्येची जय्यत तयारी केली असून विक्रेत्यांनी 450 ते 500 बकरी
केली आहे. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून दुकाने मटण विक्रीसाठी सज्ज होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरात एकूण 210 मटणाची दुकाने आहेत. त्यापैकी 153 दुकाने सुरू आहेत; तर 300 पर्यंत चिकन विक्रीची दुकाने आहेत. अनेक विक्रेत्यांनी ग्राहकांकडून होणारी मागणी आणि त्यापेक्षा जादा किती विक्री होईल, याचा अंदाज करून बकरी खरेदी केली आहेत. मटणाचा दर जैसे थे आहे.
गावरान कोंबड्याचा दर 550 ते 600 रुपये असा आहे. तर चिकनच्या जिवंत पक्षी दर 100 ते 120 रुपये कमी झाला आहे. चिकनचा दर स्कीनसह 120 रुपये तर स्कीनशिवाय 160 रुपये प्रतिकिलोचा दर आहे. बोनलेस चिकन 250 रुपये आणि लेगपीस 250 रुपये दर आहेत. थाळीसह चिकन 65, चिकन लॉलीपॉप, बटर चिकन, खर्डा चिकन, चिकन कोल्हापुरी यासह चिकनच्या विविध पदार्थांना मागणी वाढली आहे.