Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : आदित्य ठाकरे दोन ऑगस्ट रोजी कोल्हापूरात

Kolhapur : आदित्य ठाकरे दोन ऑगस्ट रोजी कोल्हापूरात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांचा गट बाहेर पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणी करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांचा गट बाहेर पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणी करत आहेत. विशेषतः आदित्य ठाकरे यांनी जिल्हा निहाय मेळावे सुरू केलेले आहेत.

आदित्य ठाकरे हे येत्या दोन ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांचे कोल्हापूर, गारगोटी आणि जयसिंगपूर येथे मेळावे होणार आहेत. ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा हा एक ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. एक ऑगस्टला संध्याकाळी ते कोल्हापुरात दाखल होतील, असे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी सांगितले.

बंडखोरांच्या मतदारसंघात मेळावे दरम्यान आदित्य ठाकरे यांचा दौरा हा शिवसेनेतून जे पदाधिकारी फुटून गेले आहेत. त्यांच्याच मतदारसंघांमध्ये आयोजित केला आहे. कोल्हापूर येथील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर, शिरोळचे आमदार व माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघांमध्ये आदित्य ठाकरे मिळावे घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -