जत ; माणिकनाळ (ता. जत) येथे डाळिंब बागेत गांजा लागवड केलेल्या ठिकाणी छापा टाकून एकशे तेहतीस किलो वजनाचा ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत तेरा लाख चाळीस हजार इतकी होते. याप्रकरणी महासिध्द लक्ष्मण बगली (रा.माणीकनाळ) यांच्यावर मानवी मनावर परिणाम करणारे अमलीपदार्थांची जोपासना केल्याप्रकरणी उमदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . संशयित आरोपी बगली फरार आहे. ही कारवाई उमदी पोलिसानी बुधवारी (दि.३) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास केली आहे.
येथे तेरा लाख, चाळीस हजारांचा गांजा जप्त
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -