Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरKolhapur; राधानगरी येथे युवकाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

Kolhapur; राधानगरी येथे युवकाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या



राधानगरी येथील युवकाने आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून युवकाने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्टीत तसा उल्लेख केल्याचे राधानगरी पोलिसांनी सांगितले आहे.



मार्केट चौक, राधानगरी येथील राहुल शामराव चांदम वय २४ हा युवकाने गुरुवारी रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरी छताच्या पाईपला साडी बांधून गळ्याला फास लावून आत्महत्या केली. त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्टीत वडिलांचे आजारपण आणि आपल्याला नोकरीधंदा मिळत नसल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करत चिट्टीत लिहून ठेवले होते. सोळंकूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मृत राहुलच्या पश्चात वडील, भाऊ असा परीवार आहे. अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -