Saturday, February 21, 2026
Homeयोजनानोकरीबीएआरसीमध्ये विविध पदांसाठी भरती, 45,000 रुपयांपर्यंत मिळेल पगार!

बीएआरसीमध्ये विविध पदांसाठी भरती, 45,000 रुपयांपर्यंत मिळेल पगार!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांना बीएआरसीमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भाभा अणु संशोधन केंद्राने वैज्ञानिक सहाय्यक, परिचारिका, उप अधिकारी या पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते BARC ची अधिकृत वेबसाईटवर barc.gov.in जाऊन अर्ज दाखल करु शकतात.

BARC च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. 12 सप्टेंबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी 12 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करावा. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 36 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी बीएआरसीच्या वेबसाईटला भेट द्यावी.



अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 12 सप्टेंबर 2022

BARC Recruitment 2022 : पदांचा तपशील –
– एकूण पदं – 36 पदे
– परिचारिकाची – 13 पदे
– वैज्ञानिक सहाय्यक – 19 पदे
– सब ऑफिसर – 4 पदे

BARC Recruitment 2022 : वयोमर्यादा
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे. तर कमाल वय 45 वर्षांपर्यंत असावे.

BARC Recruitment 2022 : पगार
या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 35,400 ते 44,900 रुपये पगार मिळेल.

BARC Recruitment 2022 : अर्ज फी –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

BARC Recruitment 2022 : निवड प्रक्रिया
या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना पूर्व चाचणी, आगाऊ चाचणी आणि कौशल्य चाचणी या तीन टप्प्यांतून जावे लागेल.

BARC Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता –
– या भरती प्रक्रियेअंतर्गत परिचारिका पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय 12 ते 15 वर्षांचा अनुभव असावा.
– सायंटिफिक असिस्टंट पदासाठी उर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा असावा. याशिवाय 12 ते 15 वर्षांचा अनुभव असावा.
– तर सब ऑफिसर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 12वी पास असावा. याशिवाय 12 ते 15 वर्षांचा अनुभव असावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -