Tuesday, December 16, 2025
Homeक्रीडासारा तेंडुलकर आणि शुभमनचे ब्रेकअप? इंस्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो

सारा तेंडुलकर आणि शुभमनचे ब्रेकअप? इंस्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो

ताजी बातमी ऑनलाईन टीम

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. या कामगिरीनंतर शुबमन गिल आणि सचिनची मुलगी सारा तेंडुलकरचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवायला सुरुवात केली आणि दोघांच्या अफेअरच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येऊ लागल्या.



दरम्यान, सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. याबद्दल विविध माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असे समजते की, सारा आणि शुबमन यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. मात्र सारा शुबमनची बहीण शहनीलला इन्स्टावर फॉलो करत आहे. अशा परिस्थितीत दोघांचे ब्रेकअप झाले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -