Saturday, February 21, 2026
Homeमहाराष्ट्रविधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक भिडले, आमदार एकमेकांच्या अंगावर धावले!

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक भिडले, आमदार एकमेकांच्या अंगावर धावले!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये राडा झाला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि धक्काबुक्की केली. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करत होते. विरोधी पक्षातील आमदार 50 खोके एकदम ओके म्हणत शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न गेले काही दिवस करत आहेत. त्यानंतर या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील आमदार विधीमंडळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. त्याचवेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे त्यांच्या समर्थक आमदारांसह आले. त्याचवेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार आमने सामने आले.

विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटले आहे. तसंच, हा राडा झाला तेव्हा त्याठिकाणी उपस्थित असलेले शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी विरोधकांना इशारा दिला. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असं भरत गोगावले यांनी इशारा दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -