Friday, August 1, 2025
Homeतंत्रज्ञान‘विवो’चा रंग बदलणारा मोबाईल बाजारात, फोनवर जबरदस्त डिस्काऊंट…!!

‘विवो’चा रंग बदलणारा मोबाईल बाजारात, फोनवर जबरदस्त डिस्काऊंट…!!

मोबाईल युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून एका स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. अखेर हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध झाला आहे.. ‘विवो’ कंपनीने रंग बदलणारा जबरदस्त मोबाईल बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांची त्याला चांगली पसंती मिळताना दिसत आहे..

या स्मार्टफोनचं नाव आहे, ‘विवो व्ही-25 प्रो’… ‘फ्लिपकार्ट’सह (Flipkart) ‘विवो स्टोअर’ (Vivo Store) वरून ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. हवामानातील बदलानुसार या स्मार्टफोनच्या कलरमध्येही बदल होत जातो.. या स्मार्टफोनवरील ऑफर्स, फीचर्स नि त्याच्या किंमतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

‘विवो व्ही-25 प्रो’ची वैशिष्ट्ये

‘विवो व्ही-25 प्रो’ (Vivo V25 Pro) या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच फुल एचडी प्लस (2376×1080 पिक्सेल) अमोल्ड डिस्प्ले दिला आहे.

फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. त्यात 64 मेगापिक्सलचा प्राथमिक सेंन्सर, सोबत 8 मेगापिक्सलचा वाइड सेंन्सर व 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंन्सर असेल.. तसेच सेल्फीसाठी समोर 32 मेगापिक्सल कॅमेरा सेंन्सर मिळणार आहे.

स्पीड व मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 1300 चिपसेटसह 12 जीबीपर्यंत रॅम दिली आहे.
66 डब्ल्यू फास्ट चार्ज सपोर्ट असलेली 4830 mAh बॅटरी दिली आहे.

फोनमध्ये रंग बदलणारे ‘फ्लोराईट एजी ग्लास डिझाइन’ दिलं आहे, जे यूव्ही प्रकाश पडल्यावर मागील पॅनेलचा रंग बदलतो.

फोनमध्ये 256 GB पर्यंत स्टोरेज दिले आहे. हा फोन Android 12 वर आधारित FunTouchOS 12 वर काम करतो.

ऑफर्सबाबत…

‘विवो’ कंपनीचा हा फोन 8 GB रॅम / 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 35,999 रुपये आहे. टॉप मॉडेलमध्ये कंपनीने 12 GB रॅम / 256 GB स्टोरेज दिले आहे. त्याची किंमत 39,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट व कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर आजपासून फोनची विक्री सुरू झाली आहे. सेलिंग ब्लू व ब्लॅक कलरमध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे..

‘फ्लिपकार्ट’वर या फोनवर ‘एचडीएफसी’ क्रेडिट-डेबिट कार्डवर 3500 रुपये, ‘एसबीआय’ क्रेडिट कार्डवर 10 टक्के (सुमारे 750 रुपयांपर्यंत), तसेच ईएमआय ट्रान्झेक्शनवर 10 टक्के (सुमारे 1500 रुपयांपर्यंत) सूट मिळेल. शिवाय, 20,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटही मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -