Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर गोकुळच्या सभेच्या जागेवरून वाद; महाडिकांचा एकाकी लढा

कोल्हापूर गोकुळच्या सभेच्या जागेवरून वाद; महाडिकांचा एकाकी लढा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

‘गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट रोजी होत आहे. या सभेच्या ठिकाणावरुन महाडिक-पाटील गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. सत्तांतरानंतर विरोधी आघाडीतील संचालिका शौमिका महाडिक यांचा गोकुळमध्ये एकाकी लढा सुरु आहे. तर बाळासो खाडे, आंबरिष घाटगे आणि चेतन नरके यांनी गेली सव्वा वर्ष ‘मौन सर्वार्थ साधनम्’ अशी भूमिका घेतली आहे. विरोधी आघाडीतील हे तीनही संचालक सत्ताधारयांशी एकरुप झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सभेमध्ये खाडे, घाटगे, नरके व्यासपीठावर बसणार की समोर उभारुन कारभाराबाबत जाब विचारणार याकडे सभासदांचे लक्ष आहे.



जिल्हय़ाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणारया गोकुळमध्ये तब्बल 35 वर्षानंतर सत्तांतर झाले. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसह राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य, शेकाप आदी पक्षांच्या नेत्यांची मोट बांधत गोकुळमध्ये एकहाती सत्ता मिळवली. यानंतर गोकुळमध्ये बरयाच आदलाबदली झाली. यावेळी वाहतूक टेंडर प्रक्रिया, कर्मचारयांच्या बदल्या, मुंबईमधील जागा खरेदी, पुणे, मुंबई येथील दूध पॅकिंग, विक्रीचे ठेके यावरुन शौमिका महाडिक यांनी प्रसारमाध्यमांसमोर सत्ताधाऱ्यांना वळोवेळी जाब विचारला. मात्र यावेळी त्यांना त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तीन संचालकांचे पाठबळ मिळाले नाही. त्यामुळे महाडिक यांचे प्रश्न हे केवळ राहिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -