Saturday, August 2, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : उद्या कोल्हापूरचा पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर : उद्या कोल्हापूरचा पाणीपुरवठा बंद

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर ; शहरातील कोकणे मठ साठवण टाकीकडे जाणाऱ्या 16 इंची व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम शनिवारी (दि. 27) करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे. रविवारी (दि. 28) अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी व फुलेवाडी रिंगरोड परिसर, साने गुरुजी, राजेसंभाजी नगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भाग, सी व डी वॉर्डातील दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब-ह्मपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थनगर, दसरा चौक, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक परिसर, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, आझाद चौक, रविवार पेठ, उमा टॉकीज, गुजरी, देवल क्लब परिसर तसेच ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक या परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -