Thursday, November 13, 2025
Homeकोल्हापूरगडहिंग्लज कारखाना भाड्याने देणार

गडहिंग्लज कारखाना भाड्याने देणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना आसवनीसह 10 वर्षे भाडे तत्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत देण्यात आला. सहकारमंत्री तथा समिती अध्यक्ष अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक
गुरुवारी पार पडली.



सध्या कारखान्यावर प्रशासकीय मंडळ असल्याने भाडे तत्वावर देण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत.
गडहिंग्लज साखर कारखाना ब्रिस्क कंपनीला 10 वर्षे भाडय़ाने दिला होता. पण कंपनीने आठव्याच वर्षी कारखाना पुन्हा संचालक मंडळांच्या ताब्यात दिला. गेला गळीत हंगाम स्वबळावर चालवण्याचा निर्णय चेअरमनसह काही संचालकांनी घेतला होता. तर त्याचवेळी 12 संचालकांनी राजीनामे दिले. त्यातून कारखान्यावर विभागीय निबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळाची नेमणूक शासनाने केली. याच दरम्यान प्रशासक मंडळाने घेतलेल्या विशेष सभेत गडहिंग्लज साखर कारखाना चालविण्यात देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी चेअरमन श्रीपतराव शिंदे यांच्यासह काही संचालकांनी विरोध केला. पण सभेत ठराव मंजुर झाल्याने कार्यवाही सुरु झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -