ताजी बातमी ऑनलाईन टीम
आज राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ५१ तालुक्यांतल्या ६०८ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकमेव पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असून मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक विरुद्ध समरजीत घाटगे गट असा सामना रंगतोय. राज्यातल्या सत्तांतरा नंतरच्या पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीकडे जिल्ह्याच लक्ष लागून राहिले आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा
आणि तालुकानिहाय संख्या नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75. धुळे: शिरपूर- 33. जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02. बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02. अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01. वाशीम: कारंजा- 04. अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01.
यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08. नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03 4 नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01. हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04. नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17. पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02. अहमदनगर: अकोले- 45. लातूर: अहमदपूर- 01. सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08. कोल्हापूर: कागल- 01.
एकूण: 608