माजलगाव येथील धरणात २ दिवसापूर्वी डॉ.फपाळ यांचे धरणात बुडून निधन झाले होते. त्यांचे प्रेत काढण्यासाठी कोल्हापूर येथून KDRF ची टिम गेली होती. या मधील जवान राजशेखर मोरे यांचे दुर्दैवी निधन झाले. आज माजलगाव येथे एक हात मदतीचा, या भावनेतुन माजलगाव करांनी मदत फेरी काढली होती.
यामध्ये आ. प्रकाश दादा सोळंके यांनी १ लाख रूपये, जयसिंह भैय्या सोळंके यांनी १ लाख आणि लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या वतीने २ लक्ष ५२ हजार रूपये मदत कराण्यात आली.