Sunday, February 23, 2025
Homeआरोग्यलहान मुलांना HFMD चा धोका, हात पायांवर फोडांसह येतोय ताप; असा करावा...

लहान मुलांना HFMD चा धोका, हात पायांवर फोडांसह येतोय ताप; असा करावा बचाव!

पालकांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. लहान मुलांमध्ये (Children disease) आता HFMD आजाराचा धोका वाढताना दिसतोय. HFMD म्हणजे हँड, फूट अँड माऊथ डिसीज(hand foot mouth disease). या आजारामुळे लहान मुलांच्या हाता पायांवर आणि तोंडात फोड येतात. मुलांच्या संपूर्ण शरीरावर देखील फोड येऊ शकतात. 2-5 वर्षे वयाच्या मुलांना या आजाराचा सर्वात जास्त धोका असतो. कांजण्यांप्रमाणेच हे फोड असतात. मात्र या कांजण्या नसून HFMD असल्याचे समोर येत आहे.

ज्या मुलांची प्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत आहे, त्यांना या आजाराचा सर्वाधिक फटका बसतो. हा आजार बरा होण्यासाठी सुमारे 7-10 दिवस लागतात. पुरळ पूर्णपणे कोरडे होईपर्यंत मुलाला शाळेत किंवा सार्वनिक ठिकाणी खेळण्यास पाठवणे टाळा. यासोबतच त्यांना शाळेत देखील पाठवू नका. इतर लहान मुलांच्या संपर्कात ते येऊ नयेत म्हणून पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा इतर मुलांमध्येही संसर्ग पसरण्याचा धोका असतो. यामुळे या आजाराचा सामना करत असलेल्या मुलांना आयसोलेशनमध्ये ठेवावे असे डॉक्टर सांगतात. कारण या आजारावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. यामुळे पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

ही आहेत HFMD ची लक्षणे?


तोंडात फोडं येतात.
जेवण करताना त्रास होतो.
हात आणि पायांवर पुरळ येतात.
कॉक्ससॅकी व्हायरसच्या कारणाने हा आजार होतो.
मुलांना थोडा तापही येऊ शकतो.
मुलांच्या संपूर्ण शरीरात वेदना होतात.
त्रास होत असल्यामुळे मुलांमधील चिडचिड वाढते.


असा करावा बचाव


साधारणपणे हा आजार फारसा धोकादायक नसतो. संसर्ग 7 ते 10 दिवसात आपोआप दूर होतो. पण काही खबरदारी घेऊन तुम्ही तुमच्या मुलाला या आजारापासून वाचवू शकता. या काळात मुलांचे हात अनेक वेळा धुवत रहा. मुलांच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि घराची नियमित स्वच्छता करा. याशिवाय एखादी व्यक्ती आजारी असेल तर लहान मुलांना त्याच्या संपर्कात येऊ देऊ नका. त्याच्या वस्तू आणि कपडे वेगळे ठेवा. आपल्या मुलाची रोग प्रतिकारशक्ती वाढेल यासाठी विशेष काळजी घ्या. मुलांना पुरेसे पाणी प्यायला लावा. यासोबतच एकदा डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -