Friday, November 14, 2025
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाविरुद्ध आज निर्णायक सामना! जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन, खेळपट्टी आणि हवामान...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज निर्णायक सामना! जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन, खेळपट्टी आणि हवामान अपडेट

ताजी बातमी ऑनलाईन टीम

हैदराबादमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे आज दोन्ही संघ मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या मालिकेतील दुसरा सामना नागपूरमध्ये झाला होता. पावसामुळे हा सामना केवळ 8-8 षटकांचा खेळवण्यात आला. त्यामुळे आजच्या सामन्यादरम्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast), खेळपट्टीची स्थिती आणि संभाव्य प्लेइंग इलेव्हन कोणते असे हे जाणून घेऊया.


या मालिकेत खरोखरच चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांवर सर्वांचे लक्ष असेल. रोहित शर्मा चांगलाच फॉर्मात आहे, तर विराट कोहलीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा करतोय आहे. दुसरीकडे बुमराहच्या पुनरागमनाने भारतीय गोलंदाजीला देखील धार आली आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघ नक्की जिंकेल अशी भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे.

सामन्यादरम्यान हैदराबादमध्ये तापमान 24 ते 25 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आर्द्रता सुमारे 80 टक्के असण्याची अपेक्षा आहे आणि सामन्या दरम्यान दव देखील पडेल अशी अपेक्षा आहे. तसेच सामन्यादरम्यान पावसाच्या सरी देखील कोसळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -