Tuesday, November 25, 2025
Homeअध्यात्मनवरात्रीचे नऊ दिवस घाला या रंगांचे कपडे, लाभेल दुर्गा मातेचा आशिर्वाद

नवरात्रीचे नऊ दिवस घाला या रंगांचे कपडे, लाभेल दुर्गा मातेचा आशिर्वाद

आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये (Navratri 2022 Nine Days) नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातले जातात. नवरात्रीत प्रत्येक दिवशी ठराविक रंगाचे कपडे (Navratri Dress) घातल्यास देवी दुर्गा प्रसन्न होते आणि आशिर्वाद देते अशी धार्मिक मान्यता आहे. खरंतर देवीची विविध रूपे लक्षात घेऊन वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले (navratri nine colors) जातात. सर्व रंगांना आपले वेगळे महत्त्व आहे आणि ते नवरात्रोत्सवात नऊ दिवस परिधान करणे शुभ (Nine days nine colors lucky) मानले जाते. जाणून घेऊया नवरात्र उत्सवादरम्यान नऊ दिवसात कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे.

नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावे?

पहिला दिवस-पिवळा रंग :

नवरात्रीत पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्रीला पिवळा रंग प्रिय आहे असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे कपडे घालून देवीची पूजा केली जाते. असे केल्याने देवी प्रसन्न होते अशी मान्यता आहे.

दुसरा दिवस-हिरवा रंग :

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी मातेला हिरवा रंग खूप प्रिय आहे अशी मान्यत आहे. त्यामुळे देवीला या दिवशी हिरवी चुनरी आणि हिरवे अलंकार अर्पण केले जातात. या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करून देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्यास देवीची कृपा प्राप्त होते.

तिसरा दिवस-तपकिरी रंग:

नवरात्रीत तिसर्‍या दिवशी दुर्गा देवीवच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते. या दिवशी तपकिरी रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केल्यास देवी प्रसन्न होते आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करते अशी मान्यता आहे.

चौथा दिवस-केशरी रंग :

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. देवी कुष्मांडाला केशरी रंग खूप आवडतो असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी केशरी रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.

पाचवा दिवस-पांढरा रंग:

देवी स्कंदमातेला पांढरा रंग आवडतो असे मानले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. त्यामुळे भक्तांनी पूजा करताना पांढरे वस्त्र परिधान करावे.

सहावा दिवस- लाल रंग:

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा करण्याची प्रथा आहे. देवी कात्यायनीला लाल रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी देवीची पूजा करताना लाल रंगाचे कपडे अर्पण करावे. यामुळे देवी प्रसन्न होते असे मानले जाते.

सातवा दिवस- निळा रंग:

नवरात्रीत सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. माता कालरात्रीला निळा रंग आवडतो असे मानले जाते. या दिवशी देवीला निळ्या रंगाचे वस्त्र अर्पण केले जातात आणि पूजेत इतर वस्तूंही निळ्या रंगाच्या ठेवल्या जातात. या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.

आठवा दिवस- गुलाबी रंग:

नवरात्रीत आठव्या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून देवी महागौरीची पूजा केली जाते. महागौरी मातेला गुलाबी रंग खूप प्रिय आहे असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबी रंगाचे कपडे घालावे.

नववा दिवस- जांभळा रंग :

नववा दिवस हा या उत्सवाचा शेवटा दिवस असतो. या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा करण्याची प्रथा आहे. देवी सिद्धिदात्रीला जांभळा रंग खूप आहे आणि या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केली जाते. यामुळे देवी प्रसन्न होते असे मानले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -