राज्यात (Maharashtra) सध्या सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेने विरोधात बंड पुकारत देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadanvis) सरकार स्थापन केले. यानंतर पासून ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (Shinde group) असा संघर्ष राज्याला पहायला मिळतोय. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती आहे. राजकीय सुत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
खरी शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावरुन दसरा मेळाव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांकडून शिवतिर्थावर दसरा मेळावा (Dussehra gathering)घेण्याचा दावा केला जात होता. यावर तोडगा निघालाय. दरम्यान आता रश्मी ठाकरे या एकनाथ शिंदेच्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती राजकीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आहे.
उद्या ठाण्यात जाणार रश्मी ठाकरे
स्वर्गीय आनंद दिघे (Anand Dighe) यांनी टेंभी नाका येथे देवीची स्थापना केली होती. या देवीला जय आंबे देवी असे म्हटले जाते. रश्मी ठाकरे (Thane) उद्या ठाण्यात जाणार आहेत. ठाणे येथील जय आंबे नवरात्रोत्सवाला (Jai Mango Navratri festival) रश्मी ठाकरे भेट देतील. एकनाथ शिंदे यांची मानाची देवी म्हणून ठाण्यातील टेंभी नाका (Thane Tembhi Naka) जय आंबे देवीला ओळखले जाते.
शिवतिर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या स्पर्धा सुरु होती. यावर उच्च न्यायालयाने निर्णय देत ठाकरे गटाला दिलासा दिला आहे. आता दसऱ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मेळावा घेणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्याची परंपरा आहे. अनेक दशकांपासून येथे दसरा मेळावा घेतला जातो. आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे येथून शिवसैनिकांना संबोधित करत असत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मैदानावरुन शिवसैनिकांना संबोधित करत असतात. यंदाचा मेळावा खास असणार आहे. कारण शिवसेनेमध्ये पडलेली फूट, सुरु असलेला वाद आणि सत्तासंघर्ष यावर उद्धव ठाकरे नेमके काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






