Friday, December 19, 2025
Homeकोल्हापूरजागतिक पर्यटन दिन आणि कोल्हापूरच्या नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पर्यटकांना एक हजार...

जागतिक पर्यटन दिन आणि कोल्हापूरच्या नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पर्यटकांना एक हजार भेट वस्तु

जागतिक पर्यटन दिन आणि कोल्हापूरच्या नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून कोल्हापुरात आलेल्या पर्यटकांना भेट वस्तु देवून कोल्हापूरची ओळख करून दिली जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाने पर्यटन वृध्दी होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून जागतिक पर्यटन दिना निमित्त कोल्हापूर बाहेरून आलेल्या पर्यटकांना प्रातिनिधिक स्वरूपात कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत केले जाणार आहे. त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रात देवस्थान समितीच्या वतीने देवीचा प्रसाद म्हणून ओटी , अंबाबाईचे चा फोटो असलेले कॅलेंडर दिले जाणार आहे.

कोल्हापूर सराफ संघाकडून कोहापुरी साज ठुशी तर हॉटेल मालक संघाकडून गूळ, काकवी , चटणी ,मसाला अशी शिदोरी आणि जिल्हा प्रशासना कडून जिल्ह्यातील गड किल्ल्याची माहिती देणारी पुस्तके अशा एक हजार वस्तूंची भेट संध्याकाळी साडे चार वाजता मंदिर परिसरात दिली जाणार आहे.

यामुळे जिल्ह्याची ओळख होण्या बरोबरच व्यवसाय वृध्दी होण्यासाठी मदत होईल. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले असून यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, सराफ संघ , हॉटेल मालक असोसिएशन, टाक यांचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -