ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोरोनाचा संसर्ग (Covid 19) आटोक्यात आल्याचे वाटत असताना राज्यात Covid-19 विषाणूने पुन्हा डोकेवर काढले आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. अशात शुक्रवार हा चिंताजनक ठरला आहे. शुक्रवारी राज्यात 459 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली. तर पाच बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासह आज 538 जण कोरोनातून बरे होऊन घरी परते आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार 30 सप्टेंबर रोजी 459 बाधित रुग्ण आढळून आले असले तरी दिलासादायक बाब म्हणजे 538 रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यानुसार राज्यात कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची रुग्णांची एकूण संख्या 79,69,878 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या कोरोनातून बरे होण्याचा दर 98.13 टक्के झाला आहे. तर राज्यात पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यू दर हा 1.82 टक्के आहे.