ताजी बातमी ऑनलाईन टीम
आता या महिन्यामध्ये सणासुधी मुळे दसरा सणामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस भाजीपाल्याच्या दरात तेजी दिसत आहे. शनिवारीही कोबीचा एक किलोचा गड्डा ६० रुपयास होता. तर देशी गवार १०० रुपये किलो या दराने बाजारात होती. पांढरी वांगी ६० ते ७० रुपये किलो होती, दोडका सरासरी ४० रु.किलो तर ओली मिरची ५० रुपये किलो या प्रमुख भाज्यांसह अन्य भाज्यांच्या दरात वाढ झाली.
सणामुळे घरोघरी नागरिकांचे उपवास आहेत, तसेच दसऱ्यातील नऊ दिवस मांसाहार बंद आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होत आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या भाजीला मार्केटमध्ये शनिवारी सौद्यासाठी २ हजार ४५९ क्विंटल भाजीपाला आवक झाली आहे. नेहमीपेक्षा यावेळी भाजीपाला कमी आवक झाली आहे, त्याचा परिणाम दरावर झाला आहे. ऐन सणामध्ये कोथिंबीर, मेथी पेंडीच्या दरात वाढ झाली आहे.
भाजीपाला आवक व दर असे आहे.
कोबी ५०१ पोती दर सरासरी २५ रु. वांगी १०५२ बॉक्स दर १० ते ६० रु.कि. टोमॅटो १६९४ करेट, दर ५ ते ३५ रु.किलो. ओली मिरची ६९८ पोती दर १५ ते ५० रु.कि. ढब्बू मिरची ४२२ पोती, दर ५ ते ५५ रु.कि. गवार ३४९ पोती २० ते ७० रु. कि,कारली ३१३ बॉक्स २० ते ३५ रु.कि. भेंडी ७४९ करंडी १० ते ५० रु.कि. वरणा ६६पोती ४५ ते ७० रु.कि. दोडका ४६८ बॉक्स १० ते ५० रु.कि. काकडी ४७३ बॉक्स दर ५ ते २० रु.कि.फ्लॉवर ४२७ पोती दर २० रु. गड्डा. कोथिंबीर १९७६० पेंडी दर १० ते २५ रु. पेंडी, रताळी ७४५ पोती दर ५ ते ३५ रु.कि. बीट २५०० नग,६ ते ७रु. नग, मेथी १३,७९६ पेंडी आवक दर १० ते १८ रु. पेंडी.