कोल्हापुरात दसऱ्या दिवशी दारूची दुकाने बंद राहणार आहेत. ही दुकाने ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद राहतील असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढला आहे.
कोल्हापुरात दसऱ्याची शाही परंपरा आहे. या दिवशी मोठ्या उत्साहात दसरा चौकात सोनं लुटण्याचा विधी पार पडतो. शाही थाटात राज घरण्याच्या परंपरेनुसार हा विधी पार पडतो. या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्राय डे पाळला जावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दारूची दुकानें बंद करा असा आदेश काढला आहे.




